म्हापशात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे प्रदर्शन सुरू

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सने सुवर्णालंकार दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या आस्थापनाचे म्हापशात विक्री प्रदर्शन आयोजित होणे ही म्हापसा तसेच बार्देश तालुका व आजूबाजूच्या भागातील लोकांसाठी एक प्रकारे दागिने खरेदीची पर्वणीच उपलब्ध झाली आहे.

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th December 2021, 12:56 am
म्हापशात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे प्रदर्शन सुरू

ज्वेलर्सच्या विक्री प्रदर्शनात दागिने खरेदी करताना ग्राहक. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सने सुवर्णालंकार दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या आस्थापनाचे म्हापशात विक्री प्रदर्शन आयोजित होणे ही म्हापसा तसेच बार्देश तालुका व आजूबाजूच्या भागातील लोकांसाठी एक प्रकारे दागिने खरेदीची पर्वणीच उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी केले.
गोवा व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुवर्ण अलंकार व्यापारी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे शुक्रवारी सकाळी म्हापसा येथील हॉटेल सत्यहिरामध्ये आयोजित दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पेडणेकर ज्वेेलर्सच्या रोमा आदित्य पेडणेकर, संतोष मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली ६ दशके सुवर्ण व्यवसायात आपल्या विश्वसनीय सेवेने व नावीन्यपूर्ण, अलौकिक दागिन्यांच्या माध्यमातून ग्राहकांची ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर अविरत सेवा करीत आहेत, अशी माहिती कंपनीतर्फे रोमा आदित्य पेडणेकर यांनी दिली.
 उत्स्फूर्त प्रतिसाद
चोख प्रमाणित दागिने, दर्जेदार सेवा व नावीन्यपूर्ण दागिन्यांची एक अस्विस्मरणीय शृंखला या सर्वच बाबी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या यशातील गमक आहे. १९६५ पासून सुरू झालेली ही घोडदौड आजही अविरतपणे सुरू आहे. म्हापशात सुरू झालेल्या या प्रदर्शनालाही लोकांचा व सुवर्णप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विस्तार करणार  
महाराष्ट्र व गोव्यात पसरलेल्या शाखांमार्फत जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स ग्राहकांना नवनवीन दागिन्यांची रेलचेल घराघरापर्यंत पोचवत आहे. महाराष्ट्र व गोव्यातील १५ शाखांपर्यंतच मर्यादित न राहता ही घोडदौड संपूर्ण जगभर पोहोचविण्याचा कंपनीचा मानस आहे, अशी माहिती रोमा आदित्य पेडणेकर यांनी दिली.

राजेशाही संग्रह, डायमंड ज्वेलरी उत्सव, विवाह महोत्सव यू ऍण्ड मी, अशा अनेक उपक्रमांमार्फत ग्राहकांना नावीन्यपूर्ण अशा दागिन्यांची शृंखला उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे, या उपक्रमांस ग्राहकांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला आहे.
- रोमा आदित्य पेडणेकर