केपेत ७१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th January 2022, 10:19 pm
केपेत ७१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त

निर्मलानगर-केपे येथील जप्त केलेला दारूसोबत पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर व इतर.

केपे : येथील निर्मलानगर भागात केपे पोलिसांनी मंगळवारी रात्री मद्यविक्री करणाऱ्या दोन दुकानांवर छापा टाकून बेकायदेशीरपणे ठेवलेल्या ७१ हजार रुपयांच्या ५९६ मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेला हा माल अबकारी खात्याच्या केपे विभागाकडे स्वाधीन करण्यात आला आहे. केपे पोलीस स्थानकाचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी केपे पोलिसांनी १० हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली होती. आता पुन्हा पोलिसांनी दारू जप्त केली आहे. केप्यासारख्या परिसरात निवडणूक आचारसंहितेमुळे इतक्या प्रमाणात अवैध दारूसाठा सापडत असेल तर इतर वेळी असा साठा नसतो का? जर असेल तर अबकारी खात्याने आतापर्यंत अशा कारवाया का केल्या नाहीत, असे सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा