ढवळीत ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करताना बसला विजेचा झटका; वीज कर्मचारी जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 05:05 pm
ढवळीत ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करताना बसला विजेचा झटका; वीज कर्मचारी जखमी

फोंडा : बार्डे-डिचोली येथे खांबावर चढून दुरुस्तीकाम करणाऱ्या मनोज जांबावलीकरचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी घडल्यानंतर खळबळ माजली होती. ढवळी-फोंडा येथे आज सकाळी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करीत असताना विजेचा धक्का बसून उपेंद्र नाईक (३८, आपेव्हाळ-प्रियोळ) हा कर्मचारी जखमी झाला. त्याच्यावर मडगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहे. यामुळे वीज खात्याची कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

डिचोलीत वीज खांबावर चढलेल्या लाईनमन मनोजला काम करत असतानाच अचनाक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर वीज खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. आजही असाच प्रश्न निर्माण करणारी घटना ढवळीत घडली आहे. आज सकाळी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करीत असताना विजेचा धक्का बसून उपेंद्र नाईक (३८, आपेव्हाळ-प्रियोळ) हा कर्मचारी जखमी झाला. त्याच्यावर मडगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहे. यामुळे वीज खात्याची कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)