भारतीयाची हत्या करणाऱ्या चिनी नागरिकाला सिंगापूरमध्ये जन्मठेप अन् १२ फटक्यांची शिक्षा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 12:12 pm
भारतीयाची हत्या करणाऱ्या चिनी नागरिकाला सिंगापूरमध्ये जन्मठेप अन् १२ फटक्यांची शिक्षा

सिंगापूर : येथे एका चिनी नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या केली होती. आता येथील न्यायालयाने चिनी वंशाच्या सिंगापूरच्या नागरिकाला दोषी ठरवून जन्मठेप आणि उसाचे १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. २०१९ मध्ये एका नाइट क्लबबाहेर झालेल्या भांडणातून ही हत्या झाली होती.

सिंगापूरमध्ये खुनाच्या गुन्ह्यात मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. ही घटना २ जुलै २०१९ रोजी ऑर्चर्ड रोड येथील टुरिस्ट हब परिसरातील हॉटेल आणि नॉटी गर्ल क्लबच्या बाहेर घडली होती. दोषी टॅन सेन यांग (३२) याने त्या रात्री भांडणात ३१ वर्षीय सतीश नोएल गोबिदास यांची हत्या केली. टॅनसह सात जणांवर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. मानेवर चाकू लागल्याने सतीशचा मृत्यू झाला होता. यात टॅनवरील आरोप सिद्ध झाले आहेत.

भारतीयाला २० वर्षांची शिक्षा झाली

भारतीय वंशाच्या एका विवाहित पुरुषाला अलीकडेच सिंगापूरमध्ये हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्या व्यक्तीला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने आपल्या मैत्रिणीला इतर पुरुषांशी संबंध असल्याच्या रागातून ढकलून दिले होते. यात मैत्रिणीला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला होता. एम. कृष्णन असे दोषी व्यक्तीचे नाव आहे.