भोंदू तांत्रिकाची काळी जादू... विवाहितेला बनवले वासनेची शिकार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 01:28 pm
भोंदू तांत्रिकाची काळी जादू...  विवाहितेला बनवले वासनेची शिकार

सुरत : गुजरातमधील सुरत शहरात एका भोंदू तांत्रिक बाबाने एका महिलेला आपल्या वासनेची शिकार बनवले. ‘तांत्रिक विधीसाठी शरीरसंबंध ठेवण्याची आवश्यकता आहे, नाहीतर पतीचा मृत्यू होईल’, अशी भीती दाखवून त्याने महिलेवर तिच्याच बेडरूममध्ये बलात्कार केला. हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर त्याने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

तांत्रिकाने प्रथम महिलेला आश्वासन दिले की जर तिने त्याचा विधी पूर्ण केला नाही तर तिचा नवरा मरेल. तांत्रिकाचे बोलणे ऐकून महिला घाबरली. यानंतर तांत्रिकाला आपल्या योजनेत यश आले. तांत्रिकाने महिलेवर तिच्या घरातील बेडरूममध्ये बलात्कार केला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महिलेने पतीला दिली. त्यानंतर आरोपी तांत्रिकाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुरतमध्ये स्वतःला तांत्रिक सांगणारा राहुल दिनेश पंड्या एका विवाहितेच्या घरी आला. त्याला तंत्र-मंत्र माहीत होता. महिलेच्या घरी आल्यानंतर तिच्या घरात वास्तुदोष असल्याचे सांगितले. ही समस्या दूर करण्यासाठी घरात विधी करावा  लागेल, असे त्याने सांगितले. विधी केल्यानंतर वास्तू नीट होईल, असेही सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिचा नवरा नसताना तो विधी करण्यासाठी घरात आला. त्याच्या मनात काय चालले आहे, हे त्या महिलेला लक्षात आले नाही. त्यानंतर बेडरूममध्ये विधीची तयारी करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने साहित्य ठेवल्यानंतर तो महिलेच्या पाठीमागू आला आणि अश्लील चाळे करू लागला. या प्रकाराने महिला गोंधळून गेली आणि तिने विरोध केला. यावर, ‘हा विधीचा भाग आहे. त्याचे पालन केले नाही तर तुझा नवरा मरेल’, अशी भीती त्याने तिला दाखवली आणि बलात्कार केला. शिवाय तिचे अश्लील फोटोही काढले.

या घटनेमुळे खचलेल्या महिलेने पती घरी आल्यावर माहिती दिली. पतीने तत्काळ पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दिली. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

हेही वाचा