राज्यातील धरणांत ९० दिवस पुरणार इतका जलसाठा

अंजुणे धरणात सर्वांत कमी २२ टक्के तर चापोली धरणात सर्वाधिक ४९.१ टक्के पाणी शिल्लक

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
09th May, 11:26 pm
राज्यातील धरणांत ९० दिवस पुरणार इतका जलसाठा

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : राज्यातील दोन धरणांत २५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर अन्य दोन धरणांत ३४ टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. असे असले तरी राज्याला पुढील ९० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन उशिरा झाले तरी पाणीपुरवठा सुरळीत राहील अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी दिली.      

मिळालेल्या माहितीनुसार ८ मे अखेरीस अंजुणे धरणात सर्वांत कमी २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर चापोली धरणात सर्वाधिक म्हणजे ४९.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पंचवाडी धरणात २४.६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आमठाणे धरणात ३२.८ टक्के तर दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात ३३.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय गावणे धरणात ४९ टक्के तर तिळारी धरणात ३६.२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.      

मागील दोन महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली होती. मे महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ८ मे अखेरीस साळावली धरणातून पाण्याचा ८.५० घन मीटर प्रतिसेकंद (क्यूमेक्स) विसर्ग सुरू आहे. अंजुणेतून २.४० क्यूमेक्स तर तिळारी धरणातून २० क्यूमेक्स विसर्ग सुरू आहे.      

हेही वाचा