कायदा शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा २५ रोजी परीक्षा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:30 am
कायदा शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा २५ रोजी परीक्षा

पणजी : गोव्यात बीए एलएलबी कायदा विषयाच्या पदवीसाठी गोवा विद्यापीठाने प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. १३ मे हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे आणि २५ मे रोजी परीक्षा सुरू होणार आहे, असे गोवा विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
पणजीतील व्ही. एम. साळगावकर महाविद्यालय आणि मडगावच्या कारे कायदा महाविद्यालय या दोन महाविद्यालयांत कायद्याचे शिक्षण दिले जाते. या दोन्ही कायदा महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी गोवा विद्यापीठाने प्रवेश परीक्षा सक्तीची केली आहे. बारावी उत्तीर्ण होऊन बीए एलएलबी पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ वर्षासाठी गोवा विद्यापीठाने कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट ही प्रवेश परीक्षा जाहीर केली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी गोवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी. पासपोर्ट आकाराचा फोटो, सही आणि बारावीचे गुणपत्रक डिजटल रुपात १३ मेपर्यंत
अपलोड करायला हवे. जर अर्ज करण्याची शेवटची तारीख विद्यार्थ्यांना हुकली तर प्रवेशासाठी गोवा विद्यापीठ जबाबदार असणार नाही.
सर्वसामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी ५०० रुपये तर एसटी, ओबीसीसाठी २५० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे, ते ऑनलाईनच भरावे लागणार. दिव्यांग मुलांना कसलेच शुल्क असणार नाही. २० मे रोजी हॉल तिकीट मिळणार असून २५ मे रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

अशी असेल ‘गुणपरीक्षा’
या परीक्षेस पात्र ठरण्यासाठी बारावी परीक्षेतील निम्मे गुण आणि प्रवेश परीक्षेतील निम्म्या गुणांची बेरीज करून प्रवेश परीक्षेचा निकाल लावला जाणार आहे. उच्च शिक्षण संचालनालय हा निकाल जाहीर करणार आहे आणि त्यानुसार साळगावकर आणि कारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांनी शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा