गोव्यात रंगणार महिला टी-२० लीग

बीसीसीआयकडून मंजूरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th May, 12:46 am
गोव्यात रंगणार महिला टी-२० लीग


न्यूज डेस्क । गोवन वार्ता
पणजी : राज्यात लवकरच महिला टी-२० लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी मंजूरी दिली आहे. जीसीआयचे सचिव रोहन देसाई यांनी नुकतीच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची भेट घेतली. यावेळी शहा यांनी महिला टी-२० लीग स्पर्धेसाठीचे संमती पत्र देसाई यांना दिले.
या स्पर्धेत गोव्यातील महिलांचे पाच संघ सहभागी होणार आहे. फ्रँचायझी क्रिकेट लीगच्या धर्तीवर ही स्पर्धा होणार असून लवकर खेळाडूंचे लिलाव करण्यात येणार आहेत. जीसीएकडून या स्पर्धेची तयारी सुरू करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे, सांगण्यात आले.