कॅन्सरग्रस्त टिकटॉकरचा 'शेवटचा' व्हिडीओ तिच्या मृत्यूनंतर व्हायरल; म्हणाली 'मी या जगात नाहीये'

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 11:57 am
कॅन्सरग्रस्त टिकटॉकरचा 'शेवटचा' व्हिडीओ तिच्या मृत्यूनंतर व्हायरल; म्हणाली 'मी या जगात नाहीये'

कॅल्गरी,अल्बर्टा: अमेरिकेतील प्रसिद्ध टिकटॉकर किम्बर्ली निक्स वयाच्या ३१ व्या वर्षी मेटास्टॅटिक सारकोमा या दुर्मिळ कॅन्सरशी लढा देत मरण पावली. मृत्यूपूर्वी किंबर्लीने आपल्या चाहत्यांसाठी एक भावपूर्ण संदेश शूट केला होता. या संदेशामुळे सर्वांचे डोळे पाणावले आहेत. किंबर्ली टिकटॉकवर कॅन्सरशी स्वतच्या लढाईचे दस्तऐवजीकरण करत होती. कॅन्सरबद्दल जनजागृती आणि इतर ट्रेंड्सचे ती अनुसरण करत होती. तीन वर्षांपूर्वी घातक कॅन्सरचे निदान झाल्यापासून तिने टिकटॉक आणि इंस्टा सारख्या प्लॅटफॉर्मवर कॅन्सरची जनजागृती करणारे असंख्य व्हिडीओ पोस्ट केले आहेत. आपल्या मृत्यूपूर्वी देखील तिने शेवटचा व्हिडीओ आपल्या प्रोफायलमध्ये पोस्ट केला. TikTok star Dr Kimberley Nix dies of cancer at 31, leaves final video for  followers | 7NEWS

"हेलो फॉलोवर्स, तुम्ही हा व्हिडीओ पाहत असाल तर समजून जा, मी या जगात नाहीये' अशा आशयाचा हा मेसेज आहे. किंबर्लीच्या पश्चयात तिचा पती मायकेल मॅकआयझॅक याने तिचा शेवटचा GRWM व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये किंबर्लीने आपल्या फॉलोवर्सचे आभार मानले. तसेच टिकटॉकचा वापर करण्यामागील आपले काय विचार होते हे देखील स्पष्ट केले. तुमच्या मुळेच मला जगण्याचा नवा आधार मिळाला असे ती या व्हिडीओत म्हणत आहे. तिचे टिकटॉकवर एकूण १३७,००० फॉलोवर्स आहेत.  किंबर्ली २८ वर्षांची असताना तिला कॅन्सरचे निदान झाले होते. त्यावेळी ती इंटर्नल मेडिसीन कोअर रेसिडेन्सीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.  TikTok star Kimberley Nix dead at 31: Budding doctor announces her OWN death  in heartbreaking video after three-year cancer battle telling fans, 'If you  are seeing this, I have passed' | Daily

'मित्रांनो माझा प्रवास येथेच संपला आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे. तुम्ही सर्वांनी आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंगात मला साथ दिली. तुमचे प्रेम, तुम्ही दिलेली वेळ आणि माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य याबद्दल खूप धन्यवाद. तुमची इच्छा असल्यास माझ्या बायोमधील लिंकवर क्लिक करून सारकोमा कॅन्सर रिसर्च वर नोंदणी करून कॅन्सरबाबत जनजागृती करा. तसेच माझ्या पतीला @LightestCheese फॉलो करायला विसरू नका." असे तिने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. TikTok star Kimberley Nix dead at 31: Budding doctor announces her OWN death  in heartbreaking video after three-year cancer battle telling fans, 'If you  are seeing this, I have passed' | Daily

मेटास्टॅटिक सारकोमा म्हणजे काय?

मेटास्टॅटिक सारकोमा हा कर्करोगाचा एक दुर्मिळ प्रकार आहे जो अस्थिमज्जामध्ये सुरू होतो आणि संपूर्ण शरीरात चरबी आणि स्नायू यांसारख्या संयोजी ऊतकांमध्ये पसरतो. जर या कर्करोगाचे लवकर निदान केले आणि तो स्नायूंपुरताच मर्यादित असेल तर शस्त्रक्रिया सहसा यशस्वी होते आणि बरेच लोक बरे होतात. परंतु जर कर्करोग तुमच्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला असेल, तर उपचार सामान्यतः कर्करोगाच्या व्यवस्थापनावर केंद्रित असतो. बऱ्याचदा सारकोमाची लक्षणेच त्याचे निदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा आजार स्क्रीनिंग टेस्टमध्ये सहसा आढळून येत नाही. Who was TikTok star Kimberley Nix and what was her cause of death? | The US  Sun

सॉफ्ट टिश्यू सारकोमामध्ये माझे लक्षण हे सर्वात सामान्य लक्षण होते. सर्व काही पूर्णपणे सामान्य होते. पण अचानक माझी प्रकृती बिघडू लागली आणि ती कधी पूर्वपदावर आलीच नाही असेही तिने एका व्हिडिओत म्हटले होते. 

हेही वाचा