गोव्यात १२, १३ मे रोजी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 03:56 pm
गोव्यात १२, १३ मे रोजी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

पणजी : गोव्यात १२ आणि १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर ११ ते १६ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यातील कमाल तापमानात शुक्रवारी किंचित वाढ झाली. पणजीत कमाल ३४.५ अंश तर किमान २५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुरगाव येथील कमाल तापमान ३४.२ अंश व किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सात दिवस राज्यातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही.

राज्यातील विविध भागांत गुरुवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान होते. ११ ते १६ मे दरम्यान सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यां दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर हीट इंडेक्स म्हणजे जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा