फोंड्यात दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी; राजीव गांधी कला मंदिराजवळ अपघात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 04:41 pm
फोंड्यात दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी; राजीव गांधी कला मंदिराजवळ अपघात

फोंडा : येथील राजीव गांधी कला मंदिराजवळ केटीएम दुचाकीची पादचाऱ्याला धडक बसल्याने तो जखमी झाला. मंजू हरिजन (३९) असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. हा अपघात काल रात्री ९.३० वा. घडला असून मंजूवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुचाकी चालक डिओन सांतान पिंटो (२१, पेरीउदक-सावर्डे) याच्या विरोधात गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, काल रात्री जीए-०७एम-९४६७ क्रमांकाची केटीएम दुचाकी घेऊन डिओन पिंटो हा दाबाळ मार्गाने फोंडा येथे जात होता. राजीव गांधी कला मंदिरासमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या मंजू हरिजन या पादचाऱ्यावर त्याच्या दुचाकीची धडक बसली. यात मंजू गंभीर जखमी झाला. जखमीला सर्व प्रथम १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपाचार करण्यासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.