निवडणूक प्रचारासाठी केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन; २ जूनला करावे लागणार आत्मसमर्पण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 03:20 pm
निवडणूक प्रचारासाठी केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन; २ जूनला करावे लागणार आत्मसमर्पण

नवी दिल्ली : लोकसभा प्रचारात सहभागी होता यावे, यासाठी तिहार मध्यवर्ती कारागृहात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर झाला असून २ जून रोजी आत्मसमर्पण करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

केजरीवाल यांना जामीन मिळताच आम आदमी पार्टीत जल्लोष सुरू झाला आहे. मात्र, अरविंद केजरीवाल तुरुंगातून कधी बाहेर येणार हा प्रश्न आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना विधाने करण्याचे स्वातंत्र्य मिळेल का? त्याला अटींसह जामीन मिळाला आहे का? देशभरातील जनता आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत.

केजरीवाल आता आम आदमी पक्षाचा (आप) प्रचार करू शकणार आहेत. ईडीने अंतरिम जामीन देण्यास विरोध केला होता. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या युक्तिवादावर भाष्य केले. ‘या प्रकरणात कोणतीही समान रेषा काढू नये. त्यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. वास्तवात त्यांना आधी किंवा नंतरही अटक करता आली असती. आता २१ दिवसांत मोठासा काही फरक पडणार नाही. केजरीवाल २ जूनला आत्मसमर्पण करतील, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने निर्णय देताना म्हटले आहे. दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २१ मार्च रोजी ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत.

हेही वाचा